पुणे : राज्यभरातील नागरिक मोठ्या हर्षोल्हासात गणेशोत्साची तयारीची आहे. आता ही तयारीही शेवटच्या टप्प्यात आली आहे. तसेच गणपतीच्या आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल पाहायला मिळते. त्यामुळे पीएमपीएलमुळे आता ज्यादाच्या बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात 270 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहे.
तसेच गणेशोत्सवादरम्यान पीएमपीएलच्या बसेस रात्रभर सेवा धावणार आहे. यामुळे नक्कीच नागरिकांची गैरसोय टळणार आहे. तसेच सणासुदीमुळे पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. पुणे शहरात 7000 पोलीस अधीकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्त वाढण्यात आला आहे. शहर आयुक्तालयातील 5000 पोलीस कर्मचारी आहेत. तसेच स्थानिक गुन्हेचे पथक देखील तैनात आहे. सहाराच्या बाहेरील 1300 अतिरिक्त कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले. यादरम्यान दिवसभरातून चार वेळा बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तपासणी करणार आहे.