आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. तेलुगू देसम पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर आग लावून निषेध करत आहेत.दरम्यान, नायडू यांच्या बेकायदेशीर अटकेबाबत टीडीपी कार्यकर्त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तेलुगू देसम पक्षाचे खासदार केसिनेनी श्रीनिवास (नानी) यांनी राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे.
पत्रात काय लिहिलं आहे?
विजयवाडाच्या खासदारांनी आपल्या पत्रात नायडू यांच्या अटकेची माहिती दिली आहे. नायडू यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास ४५ वर्षे नि:स्वार्थपणे देशसेवेसाठी समर्पित केली आणि स्वच्छ आणि तत्त्वनिष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती.चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आलेल्या परिस्थितीमुळे या प्रक्रियेच्या वैधतेवर आणि निष्पक्षतेवर गंभीर शंका निर्माण झाली आहे. त्यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. लोकशाही मूल्यांची जोपासना करणारे नागरिक या नात्याने आम्हाला या परिस्थितीची खूप चिंता आहे. ‘
नागरिकांचा विश्वास डळमळीत
नायडू यांच्या अटकेमुळे स्वच्छ प्रशासन आणि विकासासाठी त्यांच्या समर्पणाचा आदर करणाऱ्या नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे, असा दावा खासदार ांनी केला. चंद्राबाबूंचे कायदेशीर अधिकार कायम राहतील, अशी हमी देतानाच राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून सखोल, पारदर्शक आणि निःपक्षपाती चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात तेलुगू देसम च्या खासदाराने आरोप केला आहे की, 2019 मध्ये राज्यात सत्तेत आल्यापासून वायएसआरसीपी सरकार विरोधी पक्षनेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवत आहे आणि बेकायदेशीर आणि अलोकशाही मार्गाने त्यांना अटक करत आहे.