नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषद सुरू झाल्याने पहिल्याच सत्रात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘वन अर्थ’ या पहिल्या सत्राच्या समारोपानंतर पंतप्रधान मोदी ंनी माध्यमांशी संवाद साधला. जी-२० परिषदेच्या पहिल्या सत्रात स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक जैवइंधन आघाडी स्थापन करण्यावर एकमत झाले.
“आम्ही ग्लोबल बायोफ्यूल अलायन्स सुरू करत आहोत आणि भारत जगाला या उपक्रमात सामील होण्याचे आमंत्रण देतो.
जी-२० उपग्रह मोहीम प्रक्षेपित करण्याचा प्रस्ताव
पंतप्रधान पुढे म्हणाले की, स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पंतप्रधान पुढे म्हणाले,सर्वसमावेशक ऊर्जा परिवर्तनासाठी अब्जावधी डॉलर्सची गरज असून विकसित देश यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि पुढेही बजावू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.
जी-२० नवी दिल्ली जाहीरनामा जाहीर होणार
जी-20 परिषदेच्या पहिल्या सत्रानंतर पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. पंतप्रधान म्हणाले की, भारताने नवी दिल्लीत संयुक्त जाहीरनामा जारी करण्यासाठी सदस्य देशांमध्ये करार केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानी, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा, चीनचे पंतप्रधान ली चियांग, इंडोनेशियाचे अध्यक्ष विडोडो, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, ब्राझीलचे अध्यक्ष लुईज लुला दा सिल्वा यांना संबोधित केले. अशा जागतिक नेत्यांसमोर त्यांनी ही घोषणा केली.