मुंबई : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने हिताची पेमेंट सर्व्हिसेसने काल भारतातील पहिले UPI ATM लाँच केले. हे व्हाईट लेबल एटीएम (WLA) म्हणून लाँच केले गेले आहे. याद्वारे कोणत्याही अडचणीशिवाय रोख रक्कम काढता येणार आहे. तसेच फिजिकल एटीएम ठेवण्याची गरजसुद्धा संपुष्टात येणार आहे. यामुळे काही बँकांच्या ग्राहकांना ‘क्यूआर आधारित कॅशलेस पैसे काढण्याचा’ आनंद घेता येईल, असा अनुभव मिळेल.
UPI ATM मधून पैसे कसे काढायचे?
तुम्हाला काढायची असलेली रक्कम निवडा.
तुम्ही निवडलेल्या रकमेशी संबंधित UPI QR कोड दाखवला जाईल.
QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचे UPI अॅप वापरा.
व्यवहाराची खातरजमा करण्यासाठी तुमचा UPI पिन एंटर करा.
आता तुमची रोख रक्कम एटीएममधून बाहेर येईल.