आज गोकुळाष्टमी असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अशातच उद्या गोकुळकाला म्हणजेच दहीहंडी असल्याने सर्व गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. नागरिक डीजेच्या तालावर तल्लीन होऊन आनंद लुटतात. अशातच आता पुणेहूकरांसाठी दहीहंडी संदर्भात महत्वाची बातमी आहे.
यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सव रात्री 10 वाजेपर्यंतच साजरा करता येणार आहे. याआधी शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत डॉल्बीच्या वापराला बंदी आहे.
तसेच राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सवासाठी वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे शहरात रात्री 10 वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे.