IND vs PAK World Cup 2023 Match Tickets : क्रिकेटप्रेमीना सामना म्हंटल मी जेव्हडा आनंद होतो त्याहून सामना जर भारत पाकिस्तान असेल तर तोच आनंद अक्षरशः शिगेला पोहोचतो. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यंदाचा विश्वचषक भारतामध्ये होत आहे. विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर होणार आहे. वियागोगो नावाच्या संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकिटांची किंमत तब्बल 57 लाख रुपये इतकी आहे.
हो .. तुम्ही वाचलात ते अगदी बरोबर आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकिटांची किंमत तब्बल 57 लाख रुपये इतकी आहे. वियागोगो संकेतस्थळावर अपर टीयर सेक्शनच्या एका तिकिटाची किंमत 57 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दिसतेय. तर सेक्शन एन6 चीही वेगळी स्थिती नाही. या संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकिट 80 हजार रुपयांपासून सुरु होतेय.