कोल्हापूर : पावसानं आता कमी जास्त प्रमाणात राज्यात हजेरी लावायला सुरुवात केली आहे. दरम्यान घाट रस्त्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर kolhapur जिल्ह्यातील तिलारी घाट Tilari Ghat अवजड वाहतुकीसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. अनेक ठिकाणी संरक्षक कठडे जीर्ण झाले असून दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढलेली असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगाव ,शिरोळी, पाटणे फाटा ,हलकर्णी ,नागनवाडी, चंदगड ,हेरे, मोटर वाडी, तिलारीनगर या मार्गावरून येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक या घाटातून होत असते. हा घाट अरुंद असल्याकारणाने देखील अपघाताचे प्रमाण अधिक आहे. तसेच पावसात दरड कोसळण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे तिलारी घाट हा 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत बंद करण्यात आला आहे.