लातूर : लातूरमधून एक खळबळ जनक माहिती समोर येते आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलांना सीबीएससी शाळेमध्ये दाखला घेता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या Suicide केली आहे. यामध्ये भाग्यश्री हालसे वय वर्ष 26 आणि मुलगी समीक्षा यांचा समावेश आहे.
प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांना चांगल्या शिक्षण द्यावे. परंतु सध्या शैक्षणिक क्षेत्रात देखील प्रचंड चढाओढ सुरू आहे. त्यामुळे मोठ्या शाळेत मुलांना शिक्षण द्यावे हे अनेक गरीब माता-पित्यांचे स्वप्न स्वप्नचं बनून राहते. हालाखीच्या परिस्थितीमुळे मुलांना सीबीएससी इंग्रजी शाळेत दाखला घेता येत नाही. म्हणून लातूरमधील निलंगा तालुक्यातील माळेगाव या गावांमधून आईने लेकीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पत्नी भाग्यश्री हालसे या आपल्या पतीकडे मुलांना सीबीएससी शाळेत दाखला करून द्या अशी सातत्याने मागणी करत होत्या. पण बिकट परिस्थिती पाहता पतीने पत्नीची समजूत काढली होती. परंतु याच नैराश्यातून मंगळवारी सायंकाळी भाग्यश्री या मुलगी समीक्षा हिला घेऊन गावाबाहेर गेल्या आणि गावाबाहेर असणाऱ्या एका विहिरीमध्ये उडी मारण्यापूर्वी त्यांनी पतीला देखील फोन केला होता. यावेळी दीदीच शेवटच तोंड पहा ! असं म्हणून विहिरीत उडी मारली. यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.