सोलापूर : सोलापुरातून Solapur Crime एक खळबळजनक घटना समोर येते आहे. खोटे सोने तारण ठेवून आणि खोटी कागदपत्र दाखवून सोलापुरातील कॅनरा बँकेची Canara Bank भामट्यांनी तब्बल 85 लाख 93 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस स्थानकात Police Station तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोटे सोने आणि बनावट कागदपत्र दाखवून सोलापुरातील कॅनरा बँकेची तब्बल 86 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी 14 जणांवर जोडभावी पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये कॅनरा बँकेतील अधिकृत सोन्याची तपासणी करणाऱ्या सोनाराचा देखील समावेश आहे. याप्रकरणी कॅनरा बँकेचे चीफ मॅनेजर अनिल कुमार शहापूरवाड यांनी जोडभावी पेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातील या कॅनरा बँकेतील सोनार आणि तेरा बनावट खातेदारांची खोटी कागदपत्र सादर केली. याप्रकरणी आरोपी सोनार सुनील वेदपाठक याच्यासह खातेदार जावेद वजीर सय्यद, हुसेन पापा शेख, युवराज ढेरे, कार्तिक सारसंधी, जुबेर मुल्ला, भुजंग शेळके, जयवंत ढेकळे, जैनुद्दीन शेख ,सोमनाथ शेळके, सरेश मुळे, गहिनीनाथ शिंदे, कादिर पठाण, उत्तरेश्वर बोबे या चौदा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.