छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत दुःखद अशी घटना Crime News समोर येते आहे. घरामध्ये पाळीव कुत्र्याने घाण केली म्हणून आईने संतापाने त्या कुत्र्यालाही मारले आणि मित्रांसोबत खेळणाऱ्या आपल्या 14 वर्षीय मुलाला रागवलं. मित्रांसमोर रागावलं आणि कुत्र्याला देखील मारलं याचा राग मनामध्ये धरून 14 वर्षीय राजवीरन टोकाचे पाऊल उचलून थेट गळफास घेतला आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड खळखळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजवीर राहुल गडकर वय वर्ष 14 असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे. राजवीर हा जुबली पार्क परिसरातील एका खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेत होता. नुकतीच त्याने आठवीची परीक्षा देऊन तो नववीच्या वर्गात गेला होता. राजवीरचे वडील अंध असून त्याची आई दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. दुःखद म्हणजे राजवीरच्या आईला देखील काही महिन्यांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.
राजवीरचे वडील राहुल यांनीच काही दिवसांपूर्वी घरामध्ये हा पाळीव कुत्रा आणला होता. घरामध्ये कुत्र्याने घाण केली म्हणून आईला राग आला आणि तिने कुत्र्याला मारलं तसेच आपल्या मित्रांसोबत खेळत असलेल्या 14 वर्षीय मुलावर देखील संताप व्यक्त केला. राजवीरला आपल्या मित्रांसमोर रागावलं म्हणून राग अनावर झाला त्याने घरामध्ये येऊन बेडरूममध्ये जात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती
काही वेळानं कुटुंबीयांनी राजवीर बेडरूममध्ये गेल्यानंतर बराच वेळ झाला म्हणून जाऊन पाहिले असता राजवीरन गळफास घेतला असल्याचे लक्षात आलं. दरम्यान कुटुंबीयांनी लगेचच त्याला घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.