बीड : लोकसभा निवडणुकीमध्ये यंदाचे धक्कादायक निकाल लागले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सुरस आणि अत्यंत धक्कादायक असा निकाल म्हणावा लागेल तो म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघाचा ! बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये Beed Lok Sabha constituency या पंचवार्षिकला महायुतीच्या वतीने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग सोनवणे Bajarang Sonavane यांना उमेदवारी देण्यात आली होती. खरंतर पंकजा मुंडे यांचे आज पर्यंतचे राजकीय वर्चस्व पाहता ही जागा जवळपास निश्चित होती. पण अगदी शेवटच्या क्षणाला सुरस सुरूच होती आणि सहा हजाराच्या फरकानं अखेर बजरंग सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आल आहे.
महाराष्ट्रात अशा अनेक ठिकाणी खरंतर भाजपला धक्का बसला आहे. यावर सध्या भाजप अभ्यास करत आहे असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान स्वतः बजरंग सोनवणे यांनी बीडमध्ये निवडून येण्याचं गुपित सांगितल आहे. ते म्हणाले की, ” बीड मधील मुस्लिम समाज माझ्या पाठीशी दैवता सारखा उभा राहिला त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर राहिला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा !
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे रात्री उशिरा तातडीने मनोज जरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी ते म्हणाले की, ” दादा तुमच्यामुळेच मी खासदार झालो. ” त्यामुळे अर्थातच मराठा आरक्षण हा सर्वात मोठा फॅक्टर बीडमध्ये ठरला आहे.
मराठा आरक्षणाची सर्वात मोठी धग ही बीड जिल्ह्यालाच लागली आहे. महाराष्ट्रभर खरंतर आंदोलन सुरू होती. त्याचे पडसाद देखील पडत होते. परंतु बीड मध्येच मराठा आंदोलनाचा केंद्र होता. आणि या भूकंपाच्या धक्क्यामध्ये पंकजा मुंडे यांना निस्तनाभूत करण्यात बजरंग सोनवणे यांना यश आले आहे.
Narendra Modi : “देशात EVM जिवंत आहे का? की मरून गेले? ” आजच्या भाषणामध्ये विरोधकांवर EVM मुद्द्यांवरून नरेंद्र मोदींनी साधला निशाणा