हासन लोकसभा मतदारसंघ : हासन लोकसभा मतदार संघातून Hassan Lok Sabha constituency देशाचा पहिला निकाल जाहीर करण्यात आला आहे. या लोकसभा मतदारसंघातून Lok Sabha constituencies जेडीएसचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा JD(S)’s Prajwal Revanna यांच्याविरुद्ध काँग्रेसचे श्रेयस पटेल Congress’ Shreyas Patel यांच्यामध्ये लढत झाली असून काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांनी बाजी मारली आहे.
हासन लोकसभा मतदारसंघ गाजला तो प्रज्वल रेवणना यांच्यावरील गंभीर आरोपांमुळे खरंतर प्रज्वल रेवण्णा यांना मोठा राजकीय वारसा आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे ते नातू आहेत. त्याचबरोबर कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे ते पुतणे आहेत. 2019 आली त्यांनी मोठा विजय मिळवला होता. परंतु त्यांच्यावरील गंभीर आरोपांमुळे 2024 मध्ये त्यांना काँग्रेसकडून हार मानावी लागली आहे.
काँग्रेसचे श्रेयस पटेल यांनी तब्बल 25 वर्षानंतर काँग्रेसला हासन लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून दिला आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर 2976 अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर देशभरातून कडू शब्दात टीका करण्यात आली. तर भाजपवर देखील बोट उचलण्यात आले. याचाच परिणाम म्हणून आज पहिला निकाल हसन लोकसभा मतदारसंघाचा अपेक्षेप्रमाणेच रेवण्णा यांच्या विरोधात गेला आहे.