Stock Market Update : 12 वाजल्यानंतरही शेअर बाजारात Stock Market घसरण सुरूच आहे. सेन्सेक्स 7 टक्के तर निफ्टी 8 टक्क्यांनी घसरला आहे. बाजारात ही घसरण अशीच सुरू राहिली आणि दोन्ही निर्देशांक 10 टक्क्यांनी घसरले तर सर्किट ब्रेकर होईल. स्कर्ट ब्रेकरमध्ये ट्रेडिंग काही काळ थांबते. गुंतवणूकदारांचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून सर्किट ब्रेकर बसविण्यात आले आहेत.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये तीन लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. आता कंपनीच्या एका शेअरची किंमत 1,640.00 रुपये झाली आहे. दुपारी 12 वाजता बीएसई पॉवर इंडेक्समध्ये 16 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. भेलचे समभाग 23 टक्के, अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर 20 टक्के, अदानी पॉवरचे शेअर्स 18 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
बीएसईच्या वाहन निर्देशांकात 3.49 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. आज अशोक लेलँडचा शेअर 8 टक्क्यांनी घसरला आहे. तर टाटा मोटर्स आणि अपोलो टायर्सच्या शेअरमध्येही 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय मारुती, आयशर मोटर्स आणि बजाज ऑटोचे शेअर्सही 2 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत.एकीकडे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे एफएमसीजी शेअर्समध्ये सुधारणा होत आहे. बलरामपूर चिनी, वरुण बेव्हरेजेस, रेडिको आणि आयटीसी वगळता इतर सर्व 11 समभाग तेजीसह व्यवहार करीत आहेत.
Lok Sabha Results Update : देशात भाजपच्या बालेकिल्ल्यातचं सुरुंग! मोदींची लाट ओसरली का ? जनमाणसात चर्चा