कन्याकुमारी : येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे Lok Sabha Results निकाल घोषित होणार आहेत. भाजपने अबकी बार चारसो पार असा नारा यावेळी दिला आहे. त्यामुळे आता देशभरातून निकाल नेमका का येतो. याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी आपलं लक्ष सध्या ध्यान धारणेमध्ये गुंतवलं आहे. असंच दिसते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीमध्ये ज्या शिळेवर बसून स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती. त्याच स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलवर बसून ध्यानास सुरुवात केली आहे.
गुरुवारी संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधनेला सुरुवात केली असून एक जूनला संध्याकाळपर्यंत ते ध्यानस्थ असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने तिरुअनंतपुरम पासून 97 किलोमीटर लांब तमिळनाडू मधील कन्याकुमारी पोहोचले. यावेळी त्यांनी भगवती अमान मंदिरामध्ये जाऊन आशीर्वाद घेतले.
ध्यान धारणेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अन्न घेणार नसून केवळ नारळ पाणी आणि द्राक्षांचा रस घेऊनच आपली साधना पूर्ण करणार आहे.