इस्रायल : इस्रायलने 26 मे रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील रफा Rafah येथील तंबू छावणीला भीषण आग लागली. या अग्नी तांडवामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला होता. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, इस्रायलवरील हल्ल्यांमागे असलेल्या आणखी एका अधिकाऱ्यासह वेस्ट बँकसाठी हमासच्या चीफ ऑफ स्टाफचा खात्मा करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 40 पॅलेस्टिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर ‘ऑल आयज ऑन रफा’ #All Eyes On Rafah हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतो आहे.
https://sharechat.com/tag/lmGlP7
विशेष म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू Prime Minister Benjamin Netanyahu यांनी राफा येथील हमासच्या कंपाऊंडला लक्ष्य करून हवाई हल्ले केल्याचा प्राथमिक दावा इस्रायली लष्कराने केला असला तरी ही दुर्दैवी चूक असल्याचे मान्य केले आहे. निरपराध नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करूनही एक दुर्दैवी दुर्घटना घडली, अशी खंत नेतन्याहू यांनी व्यक्त केली.
पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने गाझाच्या दक्षिण कडील रफा भागात केलेल्या बॉम्बहल्ल्याचा अनेक भारतीय सेलिब्रिटींनी निषेध केला आहे. जन्नत जुबैर, पंखुरी अवस्थी, श्वेता तिवारी, आयेशा खान, मिस्टर फैसू, गौहर खान, हिना खान, गौतम रोडे यांसारख्या भारतीय सेलिब्रिटींनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रेंडिंग वाक्य शेअर केले आहे. तसेच जागतिक नेत्यांनी त्याचा निषेध केला आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो 33 दशलक्षांहून अधिक लोकांनी शेअर केला आहे.
दाक्षिणात्य स्टार सामंथाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर इस्रायलने राफावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने अनेक इन्स्टाग्राम स्टोरीशेअर करत रफा हल्ल्याबद्दल आपला संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. “आपण अशा जगात राहतो की लहान मुलांचा शिरच्छेद करून त्यांना तंबूत जिवंत जाळले जाते यावर आपण संतुलित प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे!!! ज्यांनी हे केले, हे सक्षम केले, याला प्रोत्साहन दिले, याला अर्थसाहाय्य केले, पाठिंबा दिला, याला पाठिंबा दिला, हे सामान्य करण्यासाठी कथानक बनवले, उत्सव साजरा केला, त्या गोऱ्या पुरुषांसाठी माझ्या मनात शब्द नाहीत, फक्त शाप आहेत.