पुणे : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी रोजच नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आज ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनूर या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान डॉ. तावरे यांनी, ” निशांत बसणार नाही. मी सगळ्यांची नावे घेणार ! असा थेट इशारा दिला आहे. पण हा थेट इशारा नेमका कुणाला आहे ? हे अद्याप स्पष्टपणे समजू शकलेलं नाही.
दरम्यान ज्या रात्री हा अपघात झाला त्या रात्री प्रमुख आरोपी वेदांत अग्रवाल याचे ब्लड सॅम्पल्स तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. परंतु ससून रुग्णालयामध्ये वेदांतच्या ब्लड सॅम्पल्सला केराची टोपली दाखवून तिसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सॅम्पल तपासण्यात आले आणि रिपोर्ट निगेटिव्ह देण्यात आले होते. पोलिसांना या रिपोर्ट बाबत साशंकता वाटली म्हणून औंधच्या रुग्णालयात देखील वेदांत याचे रिपोर्ट्स पाठवण्यात आले होते. आणि या रुग्णालयातून मात्र वेदांत याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे अर्थातच ससून मधून रिपोर्टची हेराफेरी झाली हे स्पष्ट झालं होतं.
त्यानंतर विशाल अग्रवाल यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या मोबाईलवर विजय तावरे यांच्या संभाषणाचा पुरावा मिळाला. तर ज्या व्यक्तीने हे ब्लड सॅम्पल्स बदलण्यासाठी पैसे पुरवले होते त्या व्यक्तीला देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलय. एकंदरीतच अगरवाल कुटुंबीय आता चारी बाजूंनी संकटामध्ये आहे. तर यामध्ये विजय तावरे यांनी देखील मोठं आव्हान दिलं आहे.
आता नेमका हा इशारा कोणाला दिला आहे याबाबत राजकीय वर्तुळात आणि पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान चौकशीमध्ये आता अजय तावरे नेमकं कुणाचं नाव घेतात याचा धक्कादायक खुलासा लवकरच होऊ शकतो.