पुणे : पुण्यातील वेदांत अग्रवाल यांनी पोर्शे कारने केलेल्या अपघाताला Pune Accident Case पुण्याच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहिलं जाईल. या अपघातानंतर रोजच नवी अपडेट समोर येते आहे. याप्रकरणी आता ससून शासकीय रुग्णालयातील फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉक्टर अजय तावरे Dr. Ajay Taware आणि श्रीहरी हळनोर Shrihari Halnor हे दोघेजण चांगलेच संकटात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या रात्री अपघात झाला त्या रात्री पुणे पोलिसांनी वेदांत अग्रवाल Vedant Agarwal या प्रमुख आरोपीचे ब्लड सॅम्पल घेतले होते. विशाल अग्रवाल Vishal Agarwal याची कसून चौकशी झाल्यानंतर त्याच्या फोनवर तावरे याचा फोन आला असल्याचं निष्पन्न झालं आणि तपासाची सूत्र फिरली. यामध्ये फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉक्टर अजय तावरे याच्या सांगण्यानुसार श्रीहरी हळनोर यानी वेदांत अग्रवाल याच्या ब्लड सॅम्पलला केराची टोपली दाखवत दुसऱ्याचे ब्लड सॅम्पल तपासून निगेटिव्ह रिपोर्ट दिले होते. पोलिसांना याचा संशय आल्यानंतर पुन्हा दुसरे ब्लड सॅम्पल्स औंध सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यावरून ससूनने दिलेले रिपोर्ट खोटे असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर या दोघा जणांना पुणे पोलिसांनी मध्यरात्री राहत्या घरातून ताब्यात घेतले. तर आता विशाल अग्रवाल याच्या संकटामध्ये अधिक वाढ झाली असून ब्लड रिपोर्ट मधील छेडछाड आणि ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी पुन्हा अटक होऊ शकते.
https://www.facebook.com/share/v/HoS9i5WNjeGv7Lso/?mibextid=qi2Omg