बीड : राजकारण म्हटलं की त्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीला Lok Sabha Elections आरोप प्रत्यारोपांची रंगत औरच होती. पक्ष फुटाफुटीच्या राजकारणानंतर ही चढाओढ वाढली आहे. दरम्यान मतदान प्रक्रियेत देखील बेकायदेशीर घडामोडी देखील घडल्या आहेत.
अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाले असल्याचं बोललं जात आहे. तर अनेक ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे व्हिडिओ देखील आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे प्रकार देखील घडले आहेत. तर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये देखील छेडछाड झाल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आले आहेत. दरम्यान आता सर्वात जास्त प्रकरणं ही बीडमधून झाली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं म्हणणं आहे.
Lok Sabha Elections 2024 : सहाव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रियेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची सहकुटुंब उपस्थिती; 3 वाजेपर्यंत 49.20 टक्के मतदानाची नोंद
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याविरुद्ध भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये लढत झाली होती. दरम्यान बीडमध्ये अनेक ठिकाणी मतदान कर्मचारी यांना दमदाटी तसेच गैरप्रकार झाल्याचे व्हिडिओ देखील असल्यास आमदार रोहित पवार यांनी सांगितलं होतं. आता थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील निवडणूक आयोगाला हे व्हिडिओ पाठवून फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक अयोग्य यावर आता काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.