पुणे : पुण्यामध्ये शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर Pune Accident Update प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. पोर्शे सारख्या स्पोर्ट्स कारने अल्पवयीन आरोपींन दोघा जणांना चिरडलं. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या घटनेवर पडलेले पडसाद हे अत्यंत धक्कादायक आहेत.
अपघात झाल्यानंतर या अल्पवयीन आरोपीच्या नावापुढे असलेल्या बापाच्या नावामुळे मोठ्या खलबती सुरू झाल्या. या अल्पवयीन आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा आणि बरोबर खायला देण्यात आलं., त्यानंतर अवघ्या 16-17 तासांमध्ये त्याला जामीन मंजूर झाला. यामुळे पुण्याततील राजकीय व्यक्तींपासून सामान्य नागरिकांनी देखील प्रचंड संताप व्यक्त केला होता.
दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये दाखल झाले आणि याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही असे स्पष्टीकरण दिलं. कारवाईचे आदेश दिले. पण पुण्याचे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मात्र पुणे पोलीस आणि देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेस नेते रवींद्र धोंगेकर म्हणाले की, “राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले. पण पुण्यातील बिल्डर लॉबी त्यांच्यावर प्रेशर टाकू शकते. हा फार्स असू शकतो. हे फक्त दाखवण्यापुरता, पुणेकरांच समाधान करण्याकरता देवेंद्र फडणवीस आले होते. या प्रकरणात तपास अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने तपास केला, त्याच्यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही हे फक्त दाखवण्यापुरता देखावा होता. आरोपीला कोर्टात हजर केलं, तेव्हा गंभीर कलम नव्हती. मग, जज स्वत:ची चार कलम टाकून शिक्षा देणार का? पुणे पोलिसांनी तपासात चूका केल्या. पुणे पोलिसांनी पैशे घेतले. फाईव्ह स्टार ट्रीटमेंट दिली. पिझ्झा पार्टी झाली. लाल कार्पेट घालून पोलीस आरोपीला सोडण्यासाठी त्याच्या घरापर्यंत गेले होते” मुलाला पोर्शे कार देणाऱ्या बिल्डर विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे. हा बिल्डर पहिल्यापासून डिफॉल्टर आहे. महापालिकेकडे असलेल्या त्याच्या कामात तो डिफॉल्टर आहे. स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही. पुणे महापालिकेला बिल्डरकडून पैसे येण बाकी आहे”असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.