पुणे : पुण्यामध्ये शनिवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातानंतर दोघा तरुणांना हाकणाक बळी गमवावा लागला आहे. या घटनेनंतर प्रकरण मोठ्या प्रमाणावर दाबण्याचा प्रयत्न झाला. कारण बड्या बिल्डरच्या चिरंजीवांनी हा अपघात केला होता.
अपघात झाल्यानंतर विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे देखील पाठ राखण करायला पोलीस स्टेशनला पोहोचले होते अशी चर्चा आहे. त्याचबरोबर पोलिसांनी वेदांत अग्रवाल याला पिझ्झा आणि बर्गर खायला दिला अशी देखील माहिती मिळाल्यानंतर आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संत आपले होते.
पुण्यातील सामान्य जनतेमधून आता या प्रकरणावर प्रचंड संताप व्यक्त केला जात असतानाच आज स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले की, ” आरोपी वेदांत अग्रवाल याला पिझ्झा बर्गर देणाऱ्या पोलिसांना बरखास्त करू. ही घटना अतिशय गंभीर असून कोणालाही सोडणार नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे असे देखील गृहमंत्र्यांनी ठणकावल आहे.
Deputy CM Ajit Pawar : ” माझ्या मुलानं असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते ! ” पुण्याच्या त्या अपघाता विषयी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण
तसेच, “बाल न्याय मंडळाच्या पुढच्या आदेशानुसार याप्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच पोलिसांकडून कोणती वेगळी वागणूक मिळाली असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. “पोलिसांनी या घटनेत भादंविचे 304 हे कलम लावले आहे, 304 अ लावलेले नाही. त्यामुळे प्रारंभीच कठोर भूमिका घेण्यात आली. या प्रकरणातील मुलगा हा 17 वर्ष 8 महिन्याचा आहे. पण, निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झाले, त्यानुसार, गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. तसेही पोलिसांनी आपल्या पहिल्याच अर्जात नमूद केले आहे. पण, बाल न्यायाधिकरणाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही. त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.