पुणे : शनिवारी रात्री उशिरा विशाल अग्रवाल यांच्या मुलाने पोर्शे कारने दोघा तरुणांना चिडल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा अपघात झाला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशनला पोहोचले होते. त्यामुळे यास एक राजकीय रंगदेखील चढला आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बोलावं अशी मागणी होत असतानाच आता पवार यांनी देखील थेट स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, पुण्यातील अपघात प्रकरणांमध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलांना असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते. अपघात प्रकरणी चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेश अजित पवार यांनी दिले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणातील पब देखील सील केले आहेत. या अपघातानंतर आता पोलीस देखील अलर्ट मोडवर आली आहे.
एकंदरीतच पुण्यातील नाईट लाईफवर आता पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. परवानगी नसताना देखील पुण्यातील काही पब हे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे मद्य प्राशन केल्यानंतर असे अपघात घडतच असतात. पुण्यातील या अपघातानंतर आता राजकीय वर्तुळातून देखील कारवाईची मागणी होत असताना सामान्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.