अहमदाबाद : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये Lok Sabha Elections 2024 अत्यंत चित्र विचित्र प्रकार पाहायला मिळाले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून नेते एकमेकांवर बीभत्स भाषेमध्ये टिकटिकपणी करत आहेत. तर दुसरीकडे नागरिक देखील आपला संताप व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रामध्ये एकाने मतदान करण्याऐवजी ईव्हीएम EVM मशीन पेटवून दिली. तर गुजरातमध्ये आणखीनच विचित्र प्रकार घडलाय.
तर झालं असं की, तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका देशभरात सात तारखेला पार पडल्या आहेत. दरम्यान गुजरातच्या दाहोद लोकसभा मतदार संघामध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली. आरोपी विजय भाबोर यांनी फेसबुक लाईक सुरू केलं. हे लाईफ स्ट्रीमिंग सुरू असताना तो संतरामपुर मधील गोबीत या मतदान केंद्रावर पोहोचला. या ठिकाणी गेल्यावर त्यांनी थेट मतदान केंद्रमध्ये जाऊन ईव्हीएम मशीन सोबत विचित्र चाळे करायला सुरुवात केली. अर्थातच निवडणूक अधिकाऱ्याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण या निवडणूक अधिकाऱ्याला देखील त्याने दमदाटी केली. ” आम्हाला केवळ दहा मिनिटे द्या आम्ही इथेच बसून आहोत. ईव्हीएम मशीन माझ्या बापाची आहे. या क्षेत्रात आपला दबदबा आहे. असं म्हणून थेट हा आरोपी ईव्हीएम मशीन हातात घेऊन नाचत होता. आणि हा सगळा प्रकार या व्हिडिओमध्ये कैद झालाय.
प्रियंका चतुर्वेदींचा श्रीकांत शिंदेंना सल्ला, “कपाळावर लिहा मेरा बाप गद्दार है !” शितल म्हात्रेंचे प्रत्युत्तर, “बिल्ली के दात गिरे नही..!” हे नेते आहेत की बॉलीवूडचे अभिनेते ?
हा सगळा प्रकार खरंतर विचित्र आहेच. पण भयानक देखील आहे. कारण विजय भाबोर हा रमेश भाबोर यांचे सुपुत्र आहेत आणि रमेश भाबोर हे तालुका पंचायत समितीचे सभापती आहेत. त्यामुळे विजय भाबोर, मनोज मगन यांच्याविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश भाबोर हे तालुका पंचायत समितीचे सभापती असून भाजपचे सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसने आता थेट निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केली असून निवडणूक आयोग काय कारवाई करते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.