बारामती : बारामतीमध्ये लोकसभा निवडणूक जशी जाहीर झाली तसं वातावरण जे तापलेला आहे ते अजूनही वाढतेच आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत आज होते आहे.दरम्यान आज सकाळपासूनच बारामतीत वेगवान हालचाली होत असताना आता आमदार दत्ता भरणे यांनी थेट एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
हा व्हिडिओ स्वतः आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार दत्ता भरणे हे शिवीगाळ करत असल्याच स्पष्ट दिसून येते आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते असलेले नाना गवळी यांना ही शिवीगाळ करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्वतः सुप्रिया सुळे यांनी त्या गावी जाऊन नाना गवळी यांची भेट घेतली. नाना गवळी यांनी अक्षरशः रडत रडत हा घडलेला प्रसंग सुप्रिया सुळे यांना सांगितला.
हा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर करून लिहिले आहे की, “केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा. विशेष म्हणजे, ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही.”
Deputy CM Ajit Pawar : ” मेरे पास मेरी माँ है ! बाकीच्यांचा काय विचार करता..! “; अजित पवारांची कुटुंबीयांवर खोचक टिप्पणी