मुंबई : नुकत्याच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, केरळ आणि दक्षिण तमिळनाडूमध्ये समुद्रात सुमारे 0.5 मीटर ते 1.5 मीटर एवढ्या उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, चार मे पासून रात्री अडीच वाजेपासून 5 मे पर्यंत रात्री साडेअकरा वाजेपर्यंत भारतीय हवामान विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या वेळेमध्ये तब्बल 0.5 मीटर ते 1.5 मीटर एवढ्या उंचीच्या लाटा उसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिले असून या 36 तासांमध्ये मच्छीमारांनी बोटी सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा देखील सूचना देण्यात आले आहेत.
” तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या, मंत्रिमंडळातून भरपूर निधी देईन ! ” वाईमध्ये उदयनराजेंच्या प्रचारासाठी अजित पवारांचे आश्वासन