नाशिक : या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला नाशिकचा तिढा काही सुटता सुटत नाही. काही दिवसापर्यंत नाशिक मधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ या दोन या नावांची चर्चा होती. दोघांपैकी नेमकी उमेदवारी कोणाला मिळते हे केव्हा निश्चित होतं याकडे महाराष्ट्राचे लक्ष होतं. पण कोणाच्याच नावाची अद्याप निश्चिती झाली नसून आता या वादामध्ये भाजपकडून महंत अनिकेत शास्त्रींनी देखील उडी घेतली आहे.
सध्या परिस्थिती पाहता नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे, छगन भुजबळ, अजय बोरस्ते आणि माणिकराव कोकाटे या चार नावा भोवती राजकारण फिरत होतं. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शांतिगिरी महाराज यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज थेट दाखल देखील केला आहे. शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून अर्ज घेतलेल्यांमध्ये हेमंत गोडसे यांच्या सुनबाई भक्ती गोडसे यांचे देखील नाव आहे.
कोण आहे महंत अनिकेत शास्त्री
महंत अनिकेत शास्त्री हे धर्म अभ्यासक महर्षी पंचायत सिद्धपीठमचे पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. नाशिक ही एक धार्मिक नगरी असल्याकारणाने अनिकेत शास्त्री यांना उमेदवारी महायुतीने द्यावी अशी त्यांच्या भक्तांची भावना आहे.