सातारा : अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये साताऱ्या लोकसभा मतदारसंघाबाबत Satara Lok Sabha Elections तिढा सुटता सुटत नव्हता. अखेर आज महायुतीच्या वतीने भाजपने उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट देखील घेऊन आले होते. तर उदयनराजेंच्या उमेदवारी बाबत देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही संशयास्पद वक्तव्य केली होती. त्यामुळे उदयनराजेंना उमेदवारी मिळणार असा सवाल उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समर्थक आक्रमक देखील झाले होते. परंतु आज अखेर भाजपला उदयनराजेंना अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे.
उमेदवारी अधिकृतपणे घोषित झाली नव्हती परंतु तरीही साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केले होते. दरम्यान पुढच्या दोनच दिवसात उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता साताऱ्यातील तिढा सुटला असून महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उदयनराजे भोसले अशी टक्कर साताऱ्यामध्ये दिसणार आहे.