मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी Narendra Modi यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यानंतर मनसेमध्ये काही लहान-मोठी वादळ देखील आली. त्यांना आज शांत केल्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी उद्या शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
राज ठाकरे यांनी उद्या अकरा वाजता त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे महायुतीत सामील होण्याच्या निर्णयाबाबत मोठी घोषणा करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Kiran Mane : छत्रपती उदयनराजे जर भाजपकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही; संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या केलेल्या अपमानानंतर मोठे पडसाद पडायला सुरुवात
राज ठाकरे यांनी 20 मार्च रोजी थेट दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर त्यांनी बराच काळ गेल्यावर अखेर गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महायुतीला पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घोषित केला होता. या निर्णयानंतर मनसेतील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले विरोधकांनी अनेक टीकाटिप्पणी केल्या. यावर आज थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये चोख प्रत्यय उत्तर दिले.
दरम्यान आता महत्त्वाच्या भेटीगाठी, बैठका आणि पाठिंब्यानंतर उद्याच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे नेमका काय निर्णय जाहीर करतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.