पंजाब : मेन्स्ट्रुअल सायकलच्या 4 Menstrual cycle दिवसांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टी देण्याचा मोठा निर्णय पंजाब युनिव्हर्सिटीने घेतला आहे. विद्यापीठाकडून 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला असून काही नियमांचे पालन देखील विद्यार्थिनींना करावे लागणार आहे.
- विद्यार्थिनींना त्या चार दिवसांमध्ये एक दिवस सुट्टी मिळणार आहे.
- ही सुट्टी केवळ वर्ग सुरू असताना साठी घेता येणार आहे. जर परीक्षा या काळामध्ये सुरू असेल तर त्यांना सुट्टी घेता येणार नाही
- 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
या चार दिवसांमध्ये मुलींना मोठ्या प्रमाणावर वेदनांचा सामना करावा लागतो. मनस्थिती देखील त्यामुळे खराब होत असते. हे एक नैसर्गिक चक्रच असले तरीही याचा त्रास मुलींना होत असतो आणि यासाठीच दिलासा मिळावा या उद्देशाने हा कौतुकास्पद निर्णय आता पंजाब युनिव्हर्सिटीने घेतला आहे. याआधी कोचीन युनिव्हर्सिटीने देखील विद्यार्थिनींना त्या दिवसांमध्ये सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे.