वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच बराच सुटत आला आहे. दरम्यान वर्धामध्ये सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. वर्ध्यातून महायुतीच्या वतीने भाजपने रामदास तडस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान आजच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.
नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वर्धामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवारांचे आभार मानले आहे. ते म्हणाले की, ” मी शरद पवारांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती शरद पवारांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. जिल्हा परिषद, आमदारकी, नगरपालिका, नगरपरिषद जिंकलो पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही. शरद पवारांचे मनापासून आभार त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब करून दाखवला. शरद पवारांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं. ज्या महात्मा गांधींचे नाव वारंवार सांगून काँग्रेसने इतकं वर्ष राजकारण केलं. त्याच गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी करून दाखवलं. यासाठी मला त्यांचे आभार मानायचे आहेत. ” असा खोचक टोला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानताना एका अर्थी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर खोचक टीकाच केली आहे. ” गांधीजींचं वर्धा हे ना काँग्रेसचे ना शरद पवारांचं…, ते मोदी आणि भाजपच आहे. यावर शिक्कामोर्तब झालं..! ” असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
वर्ध्याचे भाजपचे अधिकृत उमेदवार रामदास तडस यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ” दहा वर्षात सातत्याने त्यांनी सर्वसामान्यांसाठी भूमिका घेतली. ते लोकांसाठी उपलब्ध होते. म्हणून जनतेचे विलक्षण प्रेम त्यांना मिळालं आहे. रामदास तडस पैलवान असून कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कुस्तीगीर परिषदेवर इतके वर्ष शरद पवारांचं पॅनल होतं पण या पैलवानाने असा डाव टाकला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटातील 3 दोषींची माफीच्या तत्त्वावर सुटका; श्रीलंकेला परत रवानगी
वर्धामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार रामदास तडस यांच्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ” गेल्या दहा वर्षात सातत्याने त्यांनी सर्वसामान्यांसाठी भूमिका घेतली. ते लोकांसाठी उपलब्ध होते. म्हणून जनतेचा विलक्षण प्रेम त्यांना मिळालं आहे. रामदास तडस पैलवान असून कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कुस्तीगीर परिषदेवर इतकं वर्ष शरद पवारांचा पॅनल होतं. पण या पैलवानाने असा डाव टाकला की कुस्तीगीर परिषद त्यांच्या हातात आली. त्यांचा चेहरा भोळा असून सगळे डावपेच माहित आहेत..! ” अशा शब्दात तडस यांचे त्यांनी कौतुक केले आहे.