मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांची भेट घेतली. अर्चना पाटील शनिवारी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
कोण आहेत शिवराज पाटील ?
- 1967 मध्ये पाटील यांनी लातूर नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. ते तीन वेळा नगराध्यक्ष झाले आहेत.
- त्यानंतर 1972 मध्ये शिवराज पाटील यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली.
- 1977 मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार झाले.
- पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
- 1980 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लातूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले.
- पाटील काँग्रेसच्या तिकिटावर येथून सात वेळा खासदार झाले.
- शिवराज पाटील दहाव्या लोकसभेचे अध्यक्षही राहिले आहेत.
- त्यांनी देशाचे गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.