मुंबई : उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख औरंगजेब म्हणून केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना चांगलंच सुनावल आहे. ते म्हणाले की, ” हा देशद्रोह आहे. देशभक्त आणि राष्ट्रभक्त या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नव्या उंचीवर नेले. बाळासाहेबांच जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलं. अशा पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं म्हणजे हा देशाचा अपमान असल्याच एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंना सुनावले खडे बोल
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, ” खरंतर औरंगजेबिवृत्ती ज्याने बापाला सोडलं नाही.. भावाला सोडलं नाही.. नातेवाईकांनाही सोडलं नाही, हीच वृत्ती या लोकांनी दाखवली. ती महाराष्ट्राने पाहिली आहे. याचे उत्तर महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका करताना म्हटले आहे की, वेळप्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीत लोटांगण घालणारे आणि नोटीस आली म्हणून घाम फुटणारे हे कोण आहेत ? खुर्चीसाठी सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातली. हे जनतेला माहित आहे असं त्यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात 48 जागा आहेत. त्यात 45 हुन अधिक जागा जिंकायचे आहेत. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांना ताकद द्यायची आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपस्थित त्यांना संबोधित केले आहे.