पुणे : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. बुधवारी भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना घोषित करण्यात आले आहे. यानंतर जगदीश मुळीक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची चर्चा आज पुण्यात सुरू आहे.
काय आहे ती पोस्ट
पुणे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ यांच्या मध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यामुळेच मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर यावर आता जगदीश मुळीक काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष होतच. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगदीश मुळीक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले आहे की,
जनतेच्या सेवेत कायमच,
कोणतेही पद नसताना माझ्यासाठी जनतेने कार्यकर्त्याने दाखवलेलं प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे.
पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद !
https://www.facebook.com/photo.php?fbid=927908128793727&set=a.518078779776666&type=3&ref=embed_post
पुण्यामध्ये सध्या त्यांच्या या पोस्टवर जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीक हे इच्छुक होते. दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेताली होती. जगदीश मुळीक यांच्या समर्थकांनी भावी खासदार असे बॅनर लावून थेट शुभेच्छा देखील दिल्या होत्या. पण उमेदवारीच्या या रस्सीखेचमध्ये मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले. त्यामुळे जगदीश मुळीक यांच्या या प्रतिक्रियेकडे सर्वांचाच लक्ष होतं. जगदीश मुळीक यांनी यावेळी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.