नवी दिल्ली : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज दिलीये. वंदे भारत ट्रेनचा प्रवास आता स्वस्त होणारे. केवळ वंदे भारतच नाही तर एसी चेअर कारसह एसी सीट असलेल्या सर्व ट्रेनचे तिकीट स्वस्त होणारे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने डिस्काउंटेड फेअर स्कीम ही नवीन योजना आणलीये. याअंतर्गत एसी ट्रेनच्या तिकिटांच्या (Train Tickets) किमती 25 टक्क्यांपर्यंत कमी होणार (Railway Fare Discount) आहेत.
योजना सुरू करण्याचा उद्देश
ट्रेनमधील सीट्सचा पुरेपूर वापर करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलीये. प्रवाशांच्या संख्येनुसार भाडे कापले जाईल. अनुभूती आणि विस्टाडोम कोचसह एसी कोचची सोय असलेल्या सर्व ट्रेनच्या एसी चेअर कार (AC Chair Car) आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये ही योजना सुरू करण्यात आलीये.
मूळ भाड्यावर कमाल 25 टक्के सवलत
गेल्या 30 दिवसात 50% पेक्षा कमी जागा असलेल्या गाड्या सवलतीसाठी विचारात घेतल्या जातील. मूळ भाड्यावर कमाल 25 टक्के सवलत मिळेल. आरक्षण शुल्क, जीएसटी असे इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जातील. ही सूट रिक्त जागांच्या आधारे कोणत्याही किंवा सर्व श्रेणींमध्ये दिली जाऊ शकते. PTO वरील तिकिटे/रेल्वे पासेसवरील भाड्यातील फरक/सवलतीचे व्हाउचर/आमदार/माजी-आमदार कूपन/खासदार/माजी खासदार/स्वातंत्र्य सेनानी यांच्याकडून नियमित क्लासवाईज (Executive Class) भाडे आकारले जाणारे.
बुक केलेल्या तिकिटांवरच सूट दिली जाईल
ट्रेन जिथून निघते त्या झोनच्या PCCM ने ठरवल्यानुसार भाड्यातील सवलत सुरुवातीला लागू होईल. ही योजना 1 वर्षाच्या कालावधीसाठी लागू असेल. गरज पडल्यास ही योजना बंद करण्यात येईल. ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले आहे, त्यांच्याकडून वाढलेले भाडे आकारले जाणार नाही. प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सवलत दिल्यास, अशा गाड्यांमध्ये तत्काळ कोटा राखून ठेवला जाणार नाही. पहिला चार्ट तयार होईपर्यंत आणि सध्याच्या बुकिंग दरम्यान बुक केलेल्या तिकिटांवरच सूट दिली जाईल. TTE ट्रेनमध्ये चढल्यास सूट देखील दिली जाऊ शकते. डीस्काऊंट जाहीर न केलेल्या सेक्शनमधील तत्काळ कोटा जाहीर करावा, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलंय.