मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता हे अधिवेशन वादविवाद आणि रंगलेलं पाहायला मिळाला आहे आजच्या आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यातील वादावादीची चर्चा अद्यापही सुरूच आहे.
खरंतर महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यातील वाद हा शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि शंभूराजे देसाई हे वेळेत मध्ये पडल्यामुळे शांत झाला होता परंतु आता महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया समोर येते आहे यावरूनच शिंदे गटात सर्व काही अलबेला नाही हे स्पष्ट होत आहे
महेंद्र थोरवे म्हणाले की, ” मंत्री असणारे दादा भुसे यांच्याकडे मी कामानिमित्ताने गेलो होतो. दोन महिन्यांपासून पाठपुरावा करतोय. आमदार भरत गोगावले असतील मी स्वतः असेल, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितले की काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केले नाही. आज मी त्यांना त्याबाबत विचारलं की, दादा बाकीच्या लोकांची कामं झाली, त्यासाठी काल तुम्ही मीटिंग घेतली, पण मी सांगितलेलं कामं, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही मीटिंगमध्ये घेतली नाही. मी त्यांना विचारायला गेलो, तर दादा भुसे माझ्यावरती थोडीसे चिडून बोलले. मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदार दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशापद्धतीने अॅरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही आहोत. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचे काम आहे. मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या,” असे थोरवे म्हणाले.
दादा भुसे माझ्याशी जोरात, मोठ्या आवाजात बोलले. म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही अशा पद्धतीने आमच्याशी बोलू नका, आम्हीही आमदार आहोत आणि तुम्हाला मंत्री आम्ही केले. आमदारांमुळेच तुम्ही मंत्री होत असतात. त्यामुळे तुम्ही आमदारांचा रिस्पेक्ट ठेवायला हवा. अशी देखील थेट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.