मुंबई : आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून नेतेमंडळींमध्ये चांगलाच भांडण आणि कटकटींचा ठरतोय. सुरुवातीला शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीची चर्चा रंगत असतानाच पुन्हा एकदा भर सभागृहातच आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये थेट हमरीतुमरी झाल्याचं चित्र पाहायला मिळाले.
एकीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील बाचाबाचीची चर्चा थांबली नसतानाच पुन्हा एकदा भाजप आमदार आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये वादविवाद झाल्याचं समजत आहे.
नेमकं काय घडलं
सभागृहामध्ये बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ” 227 आणि 236 वरून आरोप करणारे राजकारण करत आहेत. सभागृह किती वेळ चालल याचा आव आणला जात असून तुमचं सरकार असताना किती दिवस अधिवेशन घेतलं. सभागृह चालवलं? संसद सुरू होती, अन्य राज्यातील विधानसभा सुरू होत्या… यांना आज सभागृहाच्या कामकाजाची आठवण येते. ” असा टोला शेलार यांनी विरोधकांना लगावला.
यावरूनच वाद सुरू झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की भाजप आमदार आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये थेट एकेरी भाषा देखील वापरली गेल्याच समजत आहे.