मुंबई : सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान आज एक मोठी घटना सत्ताधाऱ्यांच्या गोटात पाहायला मिळाली. विधिमंडळाच्या लॉबीमध्येच आज सत्ताधार्यांमधील आमदार यांच्यामध्ये राडा झालाय.आज सत्ताधाऱ्यांच्या गोटात युती सरकार मधील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून आधी शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर थेट धक्काबुक्की झाल्याचा प्रकार देखील घडला आहे.
नेमकं काय घडलं
आज सत्ताधाऱ्यांच्या गोटात युती सरकार मधील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून आधी शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर थेट धक्काबुक्की झाल्याचा प्रकार देखील घडला आहे.
सध्या सर्वच पक्ष हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करत आहेत. अशातच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटातील दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यामध्ये मतदारसंघातील कामकाज का झाले नाही ? या कारणावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. हे काम या आधीच पूर्ण व्हायला हवे होते असं आमदार महेंद्र थोरवे यांचं म्हणणं होतं. त्यांच्या बोलण्याचा दादा भुसे यांना राग अनावर झाला आणि बाचाबाचीच रूपांतर काही वेळातच अक्षरशः धक्काबुक्की मध्ये झाल आहे. त्यानंतर भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी करून हे वाद थांबवल्याचं म्हटलं जातंय. परंतु या सत्ताधाऱ्यांमधील घटनेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगते आहे.