• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, March 10, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Web Team by Web Team
February 28, 2024
in Crime, महाराष्ट्र
0
State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने State Excise Department मोठी कारवाई केली आहे. अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून गेल्या दोन महिन्यात तब्बल २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत ४२६ वारस गुन्ह्यांची नोंद व ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २० हजार ६७५ लिटर गावठी हातभट्टी दारू, ७६१ लिटर देशी मद्य, १८ हजार २९५ लिटर विदेशी मद्य, १३८ लिटर बिअर व १ हजार ८२३ लिटर ताडीसह ३६ वाहने असा २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या व सराईत आरोपी विरूद्ध चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रासाठी दाखल ४४२ प्रस्तावांपैकी २४८ जणांचे बंधपत्र घेण्यात आले असून ९७ लाख ७१ हजार रुपये बंधपत्राची रक्कम घेण्यात आली आहे. बंधपत्र घेतल्यानंतर ४१ प्रकरणांत नियमाचे उल्लंघन निदर्शनास आले.

१ एप्रिल २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून २०३ गुन्हे नोंदवले. त्यामधील ४६८ आरोपीना अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १७० आरोपींना दोषी ठरविले असून या आरोपींना ५ लाख ८३ हजार १०० रूपये इतका द्रव्य दंड ठोठविला आहे. यामुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांसोबतच अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांनाही चाप बसणार आहे.

कारवाईसाठी 14 नियमित व 3 विशेष पथके तयार

आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने एकुण १४ नियमित व ३ विशेष पथके तयार केली ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच रात्रीची गस्त घालण्यात येणार आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्य साठ्यावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहीत वेळत चालू नसल्यास व काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र. १८००२३३९९९ व दूरध्वनी क्र. ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी केले आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

” असले चाळे बंद करा, मी भित नाही…!” जरांगे पाटील पुन्हा कडाडले, थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा निशाणा, वाचा नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील…

Next Post

Maharashtra Politics : शिंदे गटातील ‘हा’ बडा नेता पुन्हा घर वापसी करणार ? ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा, वाचा नेमकं प्रकरण

Next Post
Maharashtra Politics : शिंदे गटातील ‘हा’ बडा नेता पुन्हा घर वापसी करणार ? ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा, वाचा नेमकं प्रकरण

Maharashtra Politics : शिंदे गटातील 'हा' बडा नेता पुन्हा घर वापसी करणार ? ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा, वाचा नेमकं प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

पिंपरी चिंचवडमध्ये थरार ! चोरट्यांना हटकल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाच्या देखतच चोरट्यांचा गोळीबार

पिंपरी चिंचवडमध्ये थरार ! चोरट्यांना हटकल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाच्या देखतच चोरट्यांचा गोळीबार

2 years ago
येरवडा मध्यवर्ती कारागृहात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन

येरवडा मध्यवर्ती कारागृहात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन

2 years ago
Kiran Mane : छत्रपती उदयनराजे जर भाजपकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही; संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या केलेल्या अपमानानंतर मोठे पडसाद पडायला सुरुवात

Kiran Mane : छत्रपती उदयनराजे जर भाजपकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही; संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या केलेल्या अपमानानंतर मोठे पडसाद पडायला सुरुवात

2 years ago
Maharashtra Politics Sharad Pawar and Chhagan Bhujbal

Maharashtra Politics : भुजबळ म्हणाले – आम्ही पवारांना गुरुदक्षिणा दिली

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.