छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचं कबूल केला आहे. तर याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. परंतु मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधूनच आरक्षण दिलं जावं अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. सध्या जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजी नगरमध्ये उपचार सुरू असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis यांच्यावर निशाणा साधला आहे.
https://www.facebook.com/emahatalks/videos/1775370092931742
यावेळी जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ” त्यांचं म्हणणं आहे की दहा टक्के आरक्षण घ्यावं. मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही. हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मी भीत नाही. ” अशी रोखठोक भूमिका यावेळी त्यांनी मांडली. तसेच, ” अटक होऊ द्या अथवा चौकशी ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीवर मी ठाम आहे. सरकारला आणि विशेष करून गृहमंत्र्यांना हे सांगणं आहे की, असले चाळे तुम्ही बंद करा ! मंडप काढून फेकेन, तिथे काही खून झाले नाहीत, तिथे काही दहशतवाद्यांच केंद्र नाही. संचारबंदी लावायला तिथे काही कापाकापी झालेली नाही. तिथे साखळी उपोषण सध्या सुरू आहे. गावावर दडपशाही चालू आहे, ती बंद करा…” असा इशारा देखील थेट राज्य सरकारला जरांगे पाटील यांनी दिला आहे.