कारंजा : भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी MLA Rajendra Patni यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून पाटणे हे आजारपणाशी झुंज देत होते. आज अखेर त्यांची ही झुंज संपली आहे.
मोठी बातमी : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कारंजा विधानसभा मतदार संघाचे ते आमदार होते. राजकीय दृष्ट्या हा एक महत्त्वाचा मतदार संघ आहे. दत्तगुरुचे जन्मस्थान असलेल्या गुरु मंदिरामुळे या शहराची विशेष ओळख आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून पाटणी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात देखील दुःखाचे वातावरण आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून लिहिले आहे की,अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
ॐ शांती 🙏
https://www.facebook.com/share/v/so3SxRbAAU3DC6KH/?mibextid=qi2Omg