जालना : अंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मान्य नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्याबरोबरच मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून सर्व नोंदी सापडून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, आंतरवलीसह राज्यातील सर्व केसेस विना अट मागे घेण्यात याव्यात आणि हैदराबादचे गॅझेट घ्यायचे आणि ते स्वीकारायचे, 1901 ची जनगणना घ्यावी, बॉम्बे गॅझेट घ्या. असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
https://www.facebook.com/share/v/VRizxBiaWinEAe11/?mibextid=w8EBqM
त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही
राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिला आहे. परंतु करोडो मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे कोकणमध्ये पुरावे सापडत नव्हते म्हणून कुणबी आणि मराठा एकच आहे. जे रुसत होते म्हणून त्यांना काल कुणबी आरक्षण मिळाले आता विरोध करणारे कोणी राहिले नाही मग आता सरसकट करायला काय हरकत आहे सगळे सोयरे यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.