Rahul Gandhi meet Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करून महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये प्रवेश केलांय. पक्षाच्या नावावर आणि चिन्हावरही त्यांनी दावा केलांय. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्लीत भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय लढाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. या भेटीवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राहुल गांधी यांनी त्यांना भेटायला यावे. आम्ही सर्व एकत्र आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमच्याकडे सर्व काही आहे. काही लोक निघून गेले तरी हरकत नाही. शिवसेना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आमच्या बाजूने आहे. विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे पक्षात फूट पडली असे नाही.
शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली
शरद पवार गुरुवारीच दिल्लीत पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक त्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतली. या बैठकीत जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, पीसी चाको, वंदना चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे १३ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार म्हणाले की, मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, असा दावा कोणी करत असेल तर त्यात तथ्य नाही. काँग्रेसच्या उच्चपदस्थांनी त्यांच्या महाराष्ट्र युनिटला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर (एलओपी) घाईघाईने दावा करू नये आणि संयम राखावा. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील संकट निवळू द्यावे अशी सूचना केली. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 32 आमदार अजित पवार यांना पाठिंबा देत आहेत, तर 18 आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिलांय. महाविकास (MVA) आघाडीमध्ये काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्याचे 45 आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे (UBT) सभागृहात 17 आमदार आहेत. (Maharashtra politics)
राष्ट्रवादीची सर्व राज्ये शरद पवारांसोबत
या बैठकीनंतर पीसी चाको म्हणाले की, आमच्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आलीये. ते म्हणाले की, पक्षाकडे २७ युनिट्स आहेत. या सर्व २७ राज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सोबत राहण्याचे बोलले आहे. भेटीदरम्यान, राहुल गांधी यांनी सांगितलं की, काँग्रेसने सध्याच्या संकटाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि या दिग्गज राजकारण्याच्या पाठीशी नेहमीच उभे राहतील.