कलकत्ता : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती Mithun Chakraborty यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याची तक्रार त्यांनी केल्यानंतर त्यांना कलकत्ता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉलीवूडचे दिग्गज ज्येष्ठ अभिनेते अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना कलकत्ता येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. नेमकं त्यांना काय झाले आहे हे मात्र अद्याप स्पष्ट समजू शकले नाही. तर त्यांच्या कुटुंबीयांतर्फे देखील कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
माहितीबद्दल मिथुनदा यांच्या चहात्यांमधून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते आहे.