मुंबई : गुरुवारी रात्री माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा होणार यांनी पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आज दुपारी दोन वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यावेळी घोसाळकर यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
https://www.facebook.com/emahatalks/videos/1931198950611553
मुंबईतील दहिसरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते सुपुत्र होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नातेवाईक आणि राजकीय वर्तुळातून अनेक नेते उपस्थित आहेत. स्वतः उद्धव ठाकरे हे देखील सहकुटुंब घोसाळकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उपस्थित आहेत.
https://www.facebook.com/emahatalks/videos/760708585987317
अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या आहेत. अर्थातच अचानक झालेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी त्यांच्या पत्नी आणि लहान मुलीने हंबरडा फोडला.
Abhishek Ghosalkar Murder Case : गुरुवारी रात्री नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर