Israel Palestine conflict : पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीवरून हमास या दहशतवादी संघटनेने ०७ ऑक्टोबरला(शनिवारी) पहाटेच्या वेळी इस्रायलवर केलेला भीषण हल्ला हा संपूर्ण इस्रायला हादरवून टाकणारा ठरला आहे. तर इस्रायलने देखील पॅलेस्टाईन विरोधात युद्धाची घोषणा केल्यामुळे या दोन्ही राष्ट्रांत पुन्हा एकदा सुरू झालेला हा रक्तरंजित संघर्ष आता जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे.परंतु या सगळ्यात एक मुद्दा चर्चेचा ठरला आहे तो म्हणजे जगात सर्वाधिक नावाजलेली इस्रायलची ‘मोसाद’ ही गुप्तचर यंत्रणा इस्रायलचं इतक मोठं नुकसान करणाऱ्या हल्ल्याबाबत गाफील कशी असू शकते.तर हमास आणि मोसादचं हे प्रकरण नेमक काय आहे जाणून घेऊ
खरतर इस्रायलचे सत्ताधारी,लष्कर आणि तेथील नागरिकांना त्यांच्या मोसाद या गुप्तचर यंत्रणेबदल अंत्यत अभिमान आहे.परंतु हमासला रोखण्यात मोसाद सारखी अत्यंत चाणाक्ष गुप्तचर यंत्रणा अपयशी कशी ठरली हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.कारण इतक्या मोठ्या हल्ल्याची तयारी हमासकडून नक्कीच दीर्घकाळापासून सूरू असणार हे तर निश्चित,पण मग असे असताना मोसादकडून हमासकडे इतके दुर्लक्ष का झाले असेल?यावर काही संरक्षणतज्ञ्जाचे असे म्हणणे आहे की इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हाणून पाडण्याकडे मोसादने इतके लक्ष दिले की प्रत्यक्ष आपल्या विरोधात नेमके काय चालले आहे,याकडे मोसदाचे दुर्लक्ष झाले.
तर इस्रालयमधील काही वर्तमानपत्रानी असे वृत्त दिले आहे की गेल्या तीन-चार वर्षांत हमासची ताकद कमी झाली आहे असा भ्रम इस्रायलच्या लष्करात पसरला होता आणि मोसादने याकडे दुर्लक्ष केल्यानेच आज ही वेळ ओढवली असा कळीचा मुद्दा मांडला आहे.तसेच इस्रायलमधील राजकीय फूट आणि त्यामुळे लष्कर व गुप्तचर यंत्रणेच्या क्षमतेवर परिणाम झाला असेही टीकाकारांचे म्हणणें आहे कारण मागील ५० वर्षातील मोसादचे हे सर्वात मोठे अपयश मानले जात आहे.इस्रायलमधील अमेरिकेचे माजी राजदूत मार्टिन इंडियाक यांनी यावर असे म्हटले आहे की इस्रायला कोणताही थांगपत्ता न लागू देता इतका मोठा हल्ला करण्यात हमासला आलेले यश हे अत्यंत धक्कादायक आहे.
खरतर हमासने ०७ ऑक्टोबरच्या पहाटे अवघ्या अर्ध्या तासात ५ हजार रॉकेटचा मारा केल्याने संपूर्ण इस्रायलमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते,तसेच हमासकडून सागरी आणि जमिनी मार्गाने हल्ला करून इस्रायलच्या लष्करी स्थळावर तेथील सैन्याला ओलीस ठेवले आहे तर अनेक नागरिकांचे देखील अपहरण केले आहे आणि इस्रायलमध्ये बंदिस्त असलेल्या कैद्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.त्यामुळे इस्रायलवर झालेला हा हल्ला ९/११चा दहशतवादी हल्ला आणि पर्ल हार्बर हल्ल्याइतकाच धक्कादायक आहे असे तेथील जनतेचे म्हणणे आहे तर हमासबदल जगातील अनेक मुस्लिम देशांना सहानभुती आहे व ते हमासला आर्थिक व लष्करी मदत करतात हे सुध्दा लपून राहिलेले नाही.आता या सर्व प्रश्नांची उत्तरे भविष्यात मिळतीलही परंतु मोसादचे हे अपयश एकंदरीतच इस्रायलसाठी खूप मोठा धोका ठरले हे मात्र नक्की.