नवी दिल्ली : वीज दर प्रणालीमध्ये केलेल्या नवीन बदलांनुसार रात्रीच्या वेळी एअर कंडिशनर आणि कूलर अधिक वापरल्याने तुमचे वीज बिल वाढेल. दिवसा आणि रात्री वेगळा दर का? दिवसा सौर उर्जेवर वीज पुरवठा केला जाईल, यामुळे दिवसा वीज दर कमी असेल. तर रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल, त्यामुळे दर जास्त असेल.
दिवसाचे दर काय आहे
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर, स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांसाठी दिवसाचे दर तात्काळ कमी केले जातील. याचा अर्थ असा की, दिवसा पेक्षा रात्री एसी वापरणे युजर्सना महाग पडणारे. ToD Tariff system अंतर्गत, दिवसाचा दर सामान्य दरापेक्षा 10 टक्के-20 टक्के कमी असेल, तर दर पीक अवर्समध्ये 10 ते 20 टक्क्यांनी जास्त असेल. केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह म्हणाले की, पीक अवर्स, सोलर अवर्स आणि सामान्य तासांसाठी स्वतंत्र टॅरिफ असलेले TOD टॅरिफ ग्राहकांना त्यांच्या दरानुसार लोड व्यवस्थापित करण्यासाठी किंमत सिग्नल पाठवतात. TOD टॅरिफ यंत्रणेचा प्रभावी वापर करून, ग्राहक त्यांचे वीज बिल कमी करू शकतात.
नवीन टीओडी दर कधी लागू होईल
1 एप्रिल 2024 पासून 10 किलोवॅट आणि त्याहून अधिक मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी आणि कृषी ग्राहक वगळता इतर सर्व ग्राहकांसाठी, 1 एप्रिल 2025 पासून नवीन टीओडी दर लागू होईल. बहुतेक राज्य वीज नियामक आयोगांनी (SERCs) देशातील मोठ्या व्यावसायिक आणि औद्योगिक (C-I) श्रेणीतील ग्राहकांसाठी आधीच TOD दर लागू केले आहेत. स्मार्ट मीटरच्या स्थापनेसह, दर धोरणाच्या आदेशानुसार घरगुती ग्राहक स्तरावर टीओडी मीटरिंग सुरू केले जाईल.
स्मार्ट मीटरिंग नियम (Smart metering rules)
सरकारने स्मार्ट मीटरिंगचे नियम सोपे केले आहेत. ग्राहकांची गैरसोय न होण्यासाठी ग्राहकांच्या मागणीत कमाल मंजूर लोड/मागणीपेक्षा जास्त वाढ होण्यासाठी विद्यमान दंड कमी करण्यात आलांय. उर्जा मंत्रालयाने म्हटले आहे की, इंस्टॉलेशन तारखेपूर्वीच्या कालावधीसाठी स्मार्ट मीटरद्वारे नोंदवलेल्या कमाल मागणीच्या आधारे ग्राहकांवर कोणतेही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहकांना विजेच्या वापराबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी डेटा शेअर केला जाईल.
नवीन वीज जोडणी, परतावा आणि इतर सेवा वेळेत दिल्या जातील. ग्राहक हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सेवा प्रदात्यांना दंड आकारला जाईल आणि ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल याची खात्री करण्यासाठी हे नियम आहेत. नियमातील सध्याची सुधारणा ही वीज ग्राहकांना सक्षम करण्यासाठी, परवडणाऱ्या किमतीत 24X7 विश्वासार्ह वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि वीज क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सरकारने उपाययोजना केलीये.