पुणे : पाळीव प्राणी Pets पाळणे हा अनेकांच्या छंदाचा भाग आहे. पण खरंच एकदा मूक जनावर पाळणं हे एखाद्या माणसाला सांभाळण्याचा बरोबरीचे असते. अशा घटना घडण्याला आरोपीच्या बरोबरीने पालनकर्ते देखील तेवढेच जबाबदार असतात. प्राणी कोणताही असो, कुत्रा, मांजर, पक्षी त्यांच्या खाण्याचा पद्धती … त्याच्या ब्रीड नुसार योग्य पोषक आहार, अगदी त्यांना रोज फिरायला मोकळं बाहेर नेणे सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आजकालच्या फ्लॅट संस्कृती मध्ये मोठी जनावरे मोकळेपणे न राहतात बांधून राहतात. तर दुसरी बाजू म्हणजे मुक्या जनावरांचा विनाकारण तिरस्कार… या तिरस्काराच्या भावनेतून पुण्यात विचित्र घटना घडली आहे. शेजाऱ्यांचा कुत्रा सारखा भुंकतो आणि त्रास देतो अस म्हणत पुण्यातील PUNE CRIME हडपसर भागात एकाने रागाच्या भरात कुत्र्यावर PET DOG थेट स्पोर्ट्स गनमधून गोळीबार FIRING केला. कुत्राच्या मालकाने त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गोळीबार करणाऱ्या अली रियाज थावेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमधील “इन्केव्ह लोकमंगल सोसायटी” झेड कॉर्नर,मांजरी बुद्रुक येथे ही घटना घडलीय. कुत्रा नेहमी त्रास देतो, या कारणावरून त्यास एअरगनचा छऱ्या मारून जखमी केले. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अली रियाज थावेर या आरोपीस ताब्यात घेतलं आहे
या प्रकरणी प्रीती विकास अग्रवाल (वय 46, किरण इनक्लेव्ह, लोकमंगल सोसायटी, मांजरी बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रवाल यांनी एक कुत्रा पाळलेला होता. तिचे नावबाऊंसी असे आहे. 21 नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे कुत्रा सोसायटी समोरील रस्त्यावर बसला होता. यावेळी आरोपी त्याच्याकडे असलेल्या स्पोर्ट्स गनने गोळीबार केला. त्यामुळे या श्वानाला गंभीर इजा झाली. यात कुत्रा गंभीर जखमी झाला असून तो विकलांगदेखील झाला आहे.










