गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यात नवीन घरकुलांचे उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने पंतप्रधान आवास योजना ठप्प झाली आहे. तसेच 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षांत मराठवाड्यासाठी मंजूर 1 लाख 45 हजार 723 घरकुलांपैकी 52 हजार 499 घरकुलांची कामे झालीच नाहीत.
या योजनेत लाभ मिळणाऱ्या व्यक्तीला पाच टप्प्यात दीड लाख रुपये दिले जातात. परंतु गेल्या दोन वर्षांचे उद्दिष्ट केंद्राकडून प्राप्त झालेले नाही. तसेच 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षांत मराठवाड्यासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी सुमारे 52 हजार 499 कामे झालीच नसल्याचे समोर आले आहे.
केंद्राकडून 2020-21 साठी 41 हजार 566 उद्दिष्ट देण्यात आले होते या पैकी 33 हजार 178 कामे पूर्ण झाली. तर 8 हजार 388 कामे अपूर्ण आहेत. तसेच 2021-22 साठी 1 लाख 4 हजार 157 उद्दिष्टांपैकी केवळ 60 हजार 46 घरकुलांची कामे झाली. तर 44 हजार 111 कामे प्रलंबित आहेत.










