नवी दिल्ली : तुम्ही परदेशात सुट्टी घालवण्यासाठी जात असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स (TCS) लागू करण्याची अंतिम मुदत ३ महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. TCS चा नवीन नियम १ जुलै ऐवजी १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार आहे. मुदत वाढल्यामुळे ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत टीसीएसबाबतचा जुना नियम लागू राहणार आहे.
सध्या टीसीएसचा दर ५ टक्के आहे. १ ऑक्टोबरपासून ते २० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. याचा अर्थ असा की तुम्ही भारतीय ऑपरेटरकडून परदेशी प्रवासाचे पॅकेज विकत घेतल्यास, ऑपरेटर तुमच्याकडून पॅकेजच्या किमतीवर अतिरिक्त २० % कर वसूल करेल.
TCS नियमाचे स्पष्टीकरण देताना, आयकर आणि वैयक्तिक वित्तसंबंधित बाबींचे तज्ञ म्हणाले, समजा तुम्ही दुबईला जाण्यासाठी २० लाख रुपयांचे पॅकेज विकत घेतले. हे पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला ४०,००० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. याचे कारण म्हणजे टूर पॅकेजवर आकारला जाणारा २० टक्के टीसीएस. सध्याच्या दरानुसार, या परदेश टूर पॅकेजवर केवळ १०,००० रुपये टीसीएस आकारला जाईल. परदेशी टूर पॅकेज व्यतिरिक्त, जर तुम्ही लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत फॉरेक्स डीलरकडून विदेशी चलन खरेदी केले तर तुम्हाला २०% TCS देखील भरावा लागेल.
👉 Important changes w.r.t. Liberalised Remittance Scheme #LRS and Tax Collected at Source #TCS
— Ministry of Finance (@FinMinIndia) June 28, 2023
👉 No change in rate of #TCS for all purposes under #LRS and for overseas travel tour packages, regardless of mode of payment, for amounts up to ₹7 lakh per individual per annum
👉… pic.twitter.com/PCQlwavHZT
क्रेडिट कार्डाच्या खर्चावर सवलत
आता परदेशात आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डने केलेले व्यवहार यापुढे LRS च्या कक्षेत येणार नाहीत. म्हणजेच, यावर कोणताही कर लावला जाणार नाही. आता १ ऑक्टोबर २०२३ पासून क्रेडिट कार्डद्वारे परदेशात खर्च करणे TCS फ्री असेल. या वर्षीच्या अर्थसंकल्पात TCS च्या प्रणालीमध्ये LRS आणि फॉरेन टूर प्रोग्राम पॅकेज अंतर्गत पेमेंटवर अनेक बदल जाहीर करण्यात आले होते.
सध्या टीसीएसचा दर ५ टक्के आहे. १ ऑक्टोबरपासून ते २० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही भारतीय ऑपरेटरकडून परदेशी प्रवासाचे पॅकेज विकत घेतल्यास, ऑपरेटर तुमच्याकडून पॅकेजच्या किमतीवर अतिरिक्त 20% कर वसूल करेल.
२०% TCS भरावा लागेल
आयकर आणि वैयक्तिक वित्तसंबंधित बाबींचे तज्ञ म्हणतात, समजा तुम्ही दुबईला जाण्यासाठी 10 लाख रुपयांचे पॅकेज विकत घेतले. हे पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला 20,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. याचे कारण म्हणजे टूर पॅकेजवर आकारला जाणारा 20 टक्के टीसीएस. सध्याच्या दरानुसार, या परदेश टूर पॅकेजवर केवळ 10,000 रुपये टीसीएस आकारला जाईल. परदेशी टूर पॅकेज व्यतिरिक्त, जर तुम्ही लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत फॉरेक्स डीलरकडून विदेशी चलन खरेदी केले तर तुम्हाला 20% TCS देखील भरावा लागेल.