मुंबई : आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो आणि इतर सहा ठिकाणी काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती दरम्यान आता रोहित पवार यांना चौकशीसाठी आज हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती त्यानुसार सकाळी साडेदहा वाजताच रोहित पवार एडी कार्यालयाबाहेर हजर झाले आहेत . यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की मी मराठी माणूस आहे पळून जाणार नाही…!
ईडीन बजावलेल्या नोटीस नुसार 24 जानेवारीला म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश फवारांना दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार हे स्वतः त्यांच्या बरोबरीने संकटात उभे आहेत. आज देखील कार्यालयात दाखल होण्यापूर्वी मुंबईतील पक्ष कार्यालयात शरद पवार उपस्थित आहेत. त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतरच रोहित पवार हे ईडी कार्यालयाच्या दिशेने अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत निघाले होते.

एवढेच नाही तर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या आत्या यादेखील त्यांच्या सोबत आहेत ईडी कार्यालयामध्ये देखील त्या रोहित पवार यांच्यासोबत उपस्थित आहेत.

बारामती ॲग्रो घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे ?
कन्नड सहकारी साखर कारखान्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता तर बारामती ॲग्रोवन 50 कोटी रुपयांना या कारखान्याची खरेदी केली आहे दरम्यान हा व्यवहार पारदर्शक नसल्याचं म्हणणं आहे.