लोकसभा निवडणूक 2024 : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस भाजप आघाडीचा भाग असला तरी लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चे संकेत दिले आहेत. जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागांवर एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीएमसीचा बालेकिल्ला असलेल्या बीरभूम जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वासोबत मंगळवारी कालीघाट येथील निवासस्थानी बंद दाराआड झालेल्या संघटनात्मक बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या नेत्यांना एकट्याने लढण्याची तयारी ठेवण्यास सांगितले होते.
ममता बॅनर्जी यांची काँग्रेसवर केली टीका
तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी जागावाटपावरील चर्चेला उशीर केल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. लोकसभेच्या १० ते १२ जागांची काँग्रेसची मागणी अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले होते. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने राज्यात काँग्रेसला केवळ दोन जागा देऊ केल्या होत्या.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झालेली नाही. बंगालमध्ये आम्ही एकट्याने लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही सेक्युलर पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आहोत. आम्ही एकहाती भाजपला पराभूत करू. मी एन.एन.डी.आय आघाडीचा भाग आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा आपल्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. ‘